"फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव" - एकनाथ खडसे


 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

(Advertise)

लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे. असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.

(Advertise)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असा टोला खडसेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

Post a Comment

0 Comments