बार्शी! पानगाव येथील वीरजवान सुनील काळे यांना शासनाकडून एक कोटी अर्थसहाय्य मंजूर


बार्शी/प्रतिनिधी:

काश्मिर मध्ये अतिरेक्यांशी लढताना वीर मरण पत्करलेले केंद्रीय राखीव पोलिस दलातील (CRF) हेडकॉन्स्टेबल सुनील उर्फ किशोर दत्तात्रय काळे यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आज १ कोटी
रुपयाची मदत मंजूर करण्यात आला.

वीरमाता आणि वीर पत्नीना विभागून ही मदत देण्यात आली आहे. सैनिकी कल्याण विभागाने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. मूळचे तालुक्यातील पानगाव येथील असलेले हुतात्मा काळें सीआरपीएफच्या पुलवामा मुख्यालय असलेल्या १८२ बटालियन मध्ये कार्यरत होते. त्यांची छावणी बंड येथे होती. 

(Advertise)

अतिरेक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या छावणीवर बोनेट हल्ला करुन पळ काढल्यानंतर त्यांचा पाठलाग करताना उडालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना ठार करताना गोळ्या लागून जखमी झाल्यामुळे काळे वाना हौतात्म्य प्राप्त झाले. राज्य शासनाच्या यापुर्वीच्या निर्णयानुसार वीर पत्नी अर्चना सुनौत काळे यांना ८० लाख व वीरमाता कुसुम दत्तात्रय काळे यांना ४० लाख राज्यशासनाकडून मदत मंजूर करण्यात आली.

Post a Comment

0 Comments