ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन


 मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत.

 काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लोकवार्ता न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments