विध्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी करमाळा -वाशिंबे - मांजरगाव बसची सकाळची फेरी सुरु करा - मांजरगाव सरपंच गायत्री कुलकर्णी


वाशिंबे/प्रतिनिधी:

 कोरोना महामारी च्या काळामध्ये संपुर्ण देशामध्ये लॉक डाऊन होते , कोरोनाचा प्रसार रोखण्या च्या दृष्टीने एस टी महामंडळाने एसटी प्रवासी वाहतुक बंद केली होती सध्या प्रवासी वाहतुक सुरु झाली आहे , परंतु करमाळा वाशिंबे / मांजरगाव या मार्गावरील बसेस चालु झाल्या आहेत, परंतु सकाळी ८ वाजता करमाळा -वाशिंबे ही बस अजुन करमाळा आगाराने सुरु केलेली नाही, सध्या शाळा महाविद्यालय चालु झाले आहेत ९ वी च्या पुढचे वर्ग चालु झाले आहेत.

(Advertise)

 मांजरगाव- वीट -करमाळा -उमरड याठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणा साठी जातात त्यांच्या शाळेच्या वेळेनुसार सकाळी ८ ला करमाळा येथुन निघणारी बस चालु होणे गरजेचे असुन ती बस सुरु करावी, या वेळच्या बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखिल खुप जास्त असते कारण वेळेच्या किंवा करमाळा येथिल शासकीय कार्यालये उघडण्याच्या वेळेत शहरात पोहचण्याच्या दृष्टीने ही बस सुरु होणे महत्वाचे व गरजेचे आहे . 

तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवाशी पासाची आवश्यकता आहे . त्यांना आगार प्रमुखांनी पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी मांजरगावच्या सरपंच सौ. गायत्री महेश कुलकर्णी यांनी करमाळा बस स्थानकाचे आगार प्रमुख यांचे कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments