"विजयानंतर शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला"विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे-नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. हा भाजपाला मोठा धक्का समजला जात आहे.  विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

(Advertise)

‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ निवडला.

(Advertise)

चंद्रकांत पाटील यांना विधानसभेत विजयी होण्याचा विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता’, असा जोरदार हल्ला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले

Post a Comment

0 Comments