"शिरोळ तालुक्यातील अनेक कार्यकर्त्याच्या हातात मनसेचा झेंडा"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

अनेक पक्षांमध्ये नव्याने येणाऱ्या व पक्ष सोडणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज मोठ्या प्रमाणात असते. मात्र पक्षात प्रवेश करण्यासाठीची भूमिका ही  प्रत्येक कार्यकर्त्याची वेगवेगळी असते. कदाचित संबंधित पक्षाच्या नेत्यांचा प्रभाव, पक्षाची तत्वे व भूमिका ,अन्य काही गोष्टी व प्राप्त राजकीय परिस्थिती याचा विचार करून पक्ष प्रवेश केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध राजकीय नेते राजसाहेब ठाकरे यांच्या विचार व कार्याने प्रेरित होऊन सेनेचे आघाडीचे शिलेदार कोल्हापूर जिल्हा संघटक, संजय(आबा)भंडारे यांच्या पुढाकाराने जयसिंगपूर शहरातील 'ट्रक -डंपर चालक-मालक संघटना' यांनी किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत' आपल्या ५० चालक व मालकांच्यासह प्रवेश केला.
         
शिरोळ तालुक्यातील मनसेचे युवा नेते व मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष ,भगवंतदादा जांभळे यांनी युवा नेते किरण चव्हाण यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांची नाळ आपल्याशी जोडली गेल्या असल्यामुळे त्यांच्या धोरणात्मक व स्पष्ट भूमिकेचे समर्थन करून त्यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आव्हान केले. मनसे हा पक्ष नेहमी सत्याच्या बाजूने व गरज असणाऱ्या घटकांना कोणत्याही वेळेस मदत करणे ही पक्षाची, पक्ष नेत्यांची व कार्यकर्त्यांची  भूमिका व कार्यपद्धती आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश केलेल्या नवोदित कार्यकर्त्यांची व वाहतूकदारांच्या मनसे पक्ष सातत्याने व खंबीरपणे पाठीशी राहील अशा प्रकारचे विचार मांडून कार्यकर्त्यांना आश्वासित केले.
   
यावेळेस जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटील यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments