राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


पंढरपूर/प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुखे-पाटील यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया चालू असताना विना परवाना मतदान केंद्रावर येवून शासकिय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आला होता.
(Advertise)

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर प्रकाराबाबत अर्जाव्दारे तक्रार केली. या अर्जाच्या चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केली.
(Advertise)

क्षेत्रीय अधिकारी एस.एल.मेटकरी यांनी पदवीधर मतदान केंद्र ३९४,३९५ , ३९६ चा ४ डिसेंबर रोजीचा व साई सर्व्हिसेस पुणे यांचेकडे वेब कास्टिंग रेकॉर्डींग हार्ड डिस्क याचे अवलोकन करून सदर गुन्हा दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाचे दत्तोबा मच्छिंद्र पडवळे यांना आदेश दिले होते. पडवळे यांनी सदर प्रकाराची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिली.पोलिसांनी या प्रकरणी दिपकआबा साळुखे-पाटील यांचेविरूध्द मतदान केंद्रात विना परवाना , मतदान केंद्रातील गैर वाजवी प्रभाव पाडण्याच्या हेतूने मतदान केंद्रात प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कलम १७१ (फ), भा.दं.वि.सं.क लम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 पडवळे यांनी सदर प्रकाराची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिली.पोलिसांनी या प्रकरणी दिपकआबा साळुखे-पाटील यांचेविरूध्द मतदान केंद्रात विना परवाना , मतदान केंद्रातील गैर वाजवी प्रभाव पाडण्याच्या हेतूने मतदान केंद्रात प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कलम १७१ (फ), भा.दं.वि.सं.क लम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी मंगळवेढा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिपकआबा साळुखे-पाटील यांनी सदर मतदान केंद्रावर येवून पदवीधर मतदान केंद्र क्रमांक ३९४ व ३९६ मध्ये विना परवाना प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग ठपका ठेवण्यात आला आहे.

कोण आहेत दीपक आबा साळुंखे

दीपक आबा साळुंखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. शरद पवार यांचे तीन निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सोलापूर विधान परिषद ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ आली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात दीपक आबा साळुंखे यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments