“भाजपासोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो; काँग्रेसमुळे सगळं संपलं”


 “भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असं म्हणत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
(Advertise)

मैसूरमध्ये एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं,” असं कुमारस्वामी म्हणाले.
(Advertise)

काही महिने सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. पण, या निवडणुकीनंतर काँग्रेस व जेडीएस यांच्यातील आघाडीत मतभेद निर्माण झाले. काही आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं होतं.



Post a Comment

0 Comments