तीन मित्र घेऊन पती दारूच्या नशेत घरी आला आणि बायकोला म्हणाला….


लग्नानंतर पत्नीच्या सुरक्षेचे वचन देणारा पतीच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली असून दारूड्या पतीने आपल्या पत्नीला तीन मित्रांच्या हवाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पतीच्या तीन मित्रांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पीडितेने या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबरला घडली. दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीला मारहाण केली, तसेच शिवीगाळ केली आणि तिला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केले त्यानंतर पतीच्या तीन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित महिलेचे म्हणणे आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्री दारूड्या पती तीन मित्रांसोबत घरी आला. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिला सांगू लागला. तिने विरोध केल्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मित्रांनी बलात्कार केला, असा आरोप आहे. याआधी देखील सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोपही तिने केला असून तिच्या आरोपात किती तथ्य आहे याची देखील पोलीस शहानिशा करत आहेत.

१२ नोव्हेंबरला सकाळी हेल्पलाइन क्रमांक ११२ वर घटनेची माहिती दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर ती पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेली आणि तक्रार नोंदवली. पीडितेला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments