सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला; चौघाविरूध्द गुन्हा


मंगळवेढा/प्रतिनिधी : 

शहरात ए.टी.एम. वरून पैसे काढून निघालेल्या एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावर त्यांच्या नातेवाईकांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी आप्पासाहेब शंकरराव खांडेकर , किशोर आप्पासाहेब खांडेकर ( रा.सोलापूर ) या पिता पुत्र व अज्ञात दोन इसमाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

(Advertise)

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील जखमी फिर्यादी सोमनाथ कृष्णा हेगडकर (वय.५८) हे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी असून दि.७ रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ए.टी.एम.मधून पैसे काढून मोटर सायकलवरून घराकडे जात असताना, होनमाने हॉस्पीटलच्या समोर दोन मोटर सायकलवरून आलेले नात्याने व्याही असलेले आरोपी यांनी मोटर सायकल आडवून तुम्ही केलेल्या तडजोडीप्रमाणे वागला नाहीत, तुला बघतो असे म्हणून गच्चीस धरून चाकूने पोटाच्या उजव्या बाजूस मारून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

(Advertise)

घटनेनंतर फिर्यादी खाली कोसळताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. जखमी फिर्यादीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास मंगळवेढा शहर बीटचे पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments