कृषी कायद्याच्या विरोधात उद्या हुलजंती बंदशेतकरी संघर्ष संघटनेचा भारत बंदला पाठिंबा


मंगळवेढा/प्रतिनिधी : 

कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या भारत बंदला हुलजंती येथील शेतकरी संघर्ष  संघटनेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. तरी उद्या हुलजंती बंद ठेऊन या आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचे शेतकरी संघर्ष  संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते यांनी  सांगितले.
(Advertise)

उद्याचा बंद हा देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडीत, वाऱ्यात व सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी  आहे.लॉकडाऊनच्या काळात सगळे घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता. 
(Advertise)

आज त्यांनी आपल्याला साद घातलीय. त्याला गरज आहे. त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,’ असं आवाहन अनेक सामाजिक संघटना व विविध पक्षांनी केलं आहे. याच समर्थनात उद्या शेतकरी संघर्ष संघटनेने हुलजंती बंदचा निर्णय घेतला आहे तरी सर्वानी या बंदमध्ये मोठ्यासंख्येने सामील व्हावे असे आवाहन श्रीकांत सोमुत्ते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments