धक्कादायक : चाळीस लाखांची सुपारी घेऊन मारण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना पंढरपूर पोलिसांकडून जेरबंद


पंढरपूर/प्रतिनिधी:

पंढरपूर शहर पोलिसांनी एकास जिवे मारण्यासाठी ४० लाखाची सुपारी घेऊन तयारीत असणाऱ्या चौघांना देशी बंदूक, कोयता, कुराड, स्टीलचा पाईप यांचं जेरबंद करण्यात आले आहे, माहिती पंढरपुर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे. 

याप्रकरणी बंडू दामू मासाळ (रा. धाहीटी ता. सांगोला), हनुमंत भरत जाधव, बंडू सिद्धेश्वर घोडके (रा. बोहाळी ता. पंढरपूर) बापू उर्फ आप्पा शिवाजी गोडसे (रा. कौठाळी ता. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे
(Advertise)

नागनाथ शिवाजी घोडके (रा. इसबावी पंढरपूर) यांनी 'माझ्या जीवाला धोका आहे. मला आपण पाठवू शकता' अशी मदतीची मागणी पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे केली होती. याच माहितीच्या आधारावर गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख राजेंद्र गाडेकर यांना या प्रकरणात कारवाई करण्याचे सूचना दिल्या, त्यानंतर गाडेकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे पंढरपूर येथील सोलापूर मार्गावरच्या जुना दगडी पूल येथे सापळा रचून ब्रिजा कारमधून जाणाऱ्या हनुमंत जाधव, बंडू घोडके, बंडू मासाळ व बापू गोडसे यांना थांबून तपासणी केली असता, त्यांच्याकडे बंदूक कुऱ्हाड कोयता यांच्यासारखे जीवाला धोका असणारी आहे.

 या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असताना, चौकशी अंतर्गत त्यांनी नागनाथ शिवाजी घोडके यांना मारण्यासाठी संतोष कोकरे यांनी ४० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. नागनाथ घोडके याचे आप्पा शिवाजी गोडसे यांच्यासोबत जुने भांडण होते तर संतोष कोकरे याच्यासोबत जमिनीच्या व्यवहारा मधून वाद झाला होता. त्यातूनच बंडू घोडके बंडू घोडके याला नागनाथ शिवाजी घोडके यास ठार मारण्याचे कारस्थान रचण्यात आले, त्यात ४० लाखांची सुपारी देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता २ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
(Advertise)

दरम्यान, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, शोयब पाठण, समधान माने, गणेश पवार, इरफान शेख, सिध्दनाथ माने, सुजित जाधव यांनी ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments