ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शरद पवार यांच्या नावाने ग्रामसमृद्धी योजना



 शरद पवार येत्या १२ डिसेंबरला वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत असून त्या निमित्ताने राज्य शासनाने त्यांच्या नावे एक योजना सुरू करून गौरव केला आहे. त्यांनी केलेल्या कृषी विषयक कार्याचा म्हणून त्यांच्या नावाने ग्रामसमृद्धी योजना राबवनार आहे.निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

ह्या हा ग्रामसमृद्धीच्या कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येईल.
(Advertise)

मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’, या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कूटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल.

Post a Comment

0 Comments