शेतकऱ्यांच्या विरोधी कृषी कायद्याला विरोध म्हणून ह्या मुख्यमंत्र्यांनी ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत


केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.

(Advertise)

केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे आपण केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं प्रकाश सिंह बादल यांनी सांगितलं आहे.

(Advertise)

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुनच भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या शिरोमणी अकाली दलानं NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांनी ‘पद्म भूषण’ पुरस्कार परत करत असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रातील मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

Post a Comment

0 Comments