"माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या समोर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी जयश्री शिंदे यांच्या पतीला भावना अनावर"



प्रतिनिधी / करमाळा

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जयश्री शिंदे यांच्या पतीला भेटण्यासाठी शिवसेनेचे माजी आ. नारायण आबा पाटील गेल्यानंतर त्याला रडू कोसळले. त्याने धाई मोकलुन रडत आपल्या भावनांना वाट करून दिली. यावेळी उपस्थितांचे मन हेलावून गेले.
(Advertise)

मयत जयश्री ला दोन लहान मुली व एक मुलगा असून ही तीनही मुले सात वर्षापेक्षा लहान आहेत. घाय मोकलून रडत सांगताना तो म्हणाला की मी म्हणत होतो जाऊ नको पण ती म्हणाली अर्ध्या तासात आले लिंबू गोळा केली नाही तर वाया जातील असे सांगतील लिंबू गोळ्या करण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या निंबोणीच्या बागेत गेली अर्धा तास झाला तरी ती आली नाही, म्हणून मी तिला पाहण्यासाठी निंबोणीच्या बागेत गेलो असता फक्त तिचं मुंडके दिसेल आणि माझं आभाळ फाटल असं सांगत तो रडत होता.
(Advertise)

यावेळी माजी आ. नारायण पाटील यांनी त्याला धीर देत प्रसंगाला तोंड देण्याचे हिम्मत ठेवा असे सांगत त्याला धीर दिला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायत समिती सदस्य अतुल पैलवान पाटील, अण्णासाहेब काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(Advertise)

यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना फोन लावून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मंत्री संजय राठोड यांनी जयश्रीच्या पतीशी फोनवर बोलून त्याचे सांत्वन केले व महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे. घाबरू नका असे सांगितले. यावेळी माजी आ. नारायण आबा पाटील मंत्री संजय राठोड यांच्याशी बोलताना म्हणाले की काहीही करा पण त्या बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश काढा व मयत झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ लाख रुपयांची मदत द्या व त्यांच्या वारसाला तात्काळ वन खात्यात कायम कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश काढावा अशी विनंती केली. यावेळी मंत्री महोदय राठोड यांनी याप्रकरणी उचित कारवाई करतो असे आश्वासन दिले.

यानंतर नारायण पाटील यांनी उमरड, वीट, मांजरगाव, वंजारवाडी या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनाही करमाळा शिवसेनेच्यावतीने ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले असून तातडीने बिबट्या असलेल्या क्षेत्रात ड्रोन कॅमेरा उडवून त्याचा तपास करावा त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यात किती गावे आहेत याचीही अधिकृत माहिती गोळा करण्यासाठी यंत्रणा लावावी व तात्काळ या बिबट्याला जेरबंद करणे किंवा गोळ्या घालण्यासाठी आदेश निर्गमित करावे अशी मागणी केली आहे .या निवेदनावर माजी आमदार नारायण पाटील, महेश चिवटे, देवानंद बागल, सभापती गहिनीनाथ नवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,पै. आतुल पाटील, युवा सेनेचे अध्यक्ष विशाल गायकवाड, महिला अध्यक्ष प्रियंका गायकवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments