मंगळवेढा येथे आज डाळींब व्यापारी संकुलनाचा उद्धघाटन सोहळा


मंगळवेढा/प्रतिनिधी :

डाळिंब सौदे लिलाव वर्षपूर्ती निमित्त आज बाजार समिती येथे श्री संत दामाजी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या हस्ते डाळिंब व्यापारी संकुलनाचे उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे हे राहणार आहेत.

(Advertise)

गतवर्षी मंगळवेढा डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची डाळींब विक्री साठी होणारी तारांबळ लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा संचालक मंडळाने नवीनच डाळिंब सौदे लिलावास सुरुवात केली. या सौदे लिलावास तालुका व पंचकृषितून शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे या वर्षी बाजार समिती मंगळवेढा ने नूतन डाळिंब व्यापार संकुलनाचे उद्धिष्ट ठेवले व ते परिपूर्ण केले. या संकुलाचे उदघाटन आज दि.२३ डिसेंबर रोजी दुपारी ठीक ३ वाजता करण्याचे आयोजित केले आहे.

(Advertise)

या उदघाटन सोहळ्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,पंचायत समिती सभापती  प्रेरणाताई मासाळ,सिद्धेश्वर आवताडे,मंजुळा कोळेकर,शिलाताई शिवशरण,सूर्यकांत ढोणे,प्रदीप खांडेकर,विमलताई पाटील,उज्वला मस्के,येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,राजेंद्र सुरवसे,रामचंद्र कोंडुभैरी, अनिल बोदाडे, रतन पडवळे,निर्मला माने,लक्ष्मीबाई म्हेत्रे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी शेतकरी व व्यापारी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन उपसभापती प्रकाश जुदंळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments