जळगाव/प्रतिनिधी:
झालेल्या गुन्ह्यात मदत करतो म्हणून लाच मागणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक [एमआयडीसी ] यांनी तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली ,संदीप अशोक हजारे असे लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे ,,रायपूर येथे दिड महिन्यापासून दोन गटात वाद चालू होता, याविषयी परस्पर विरोधात दंगल,मारहाण व इतर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता, गुन्याचा तपस संदीप हजारे यांचेकडे होता, या गुन्ह्यात मदत करतो म्हणून तीस हजार रुपयांची मागणी केली असता, तडजोडी अति पंधरा हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले होते.
परंतु तक्रारदार यांचे मनाविरुद्ध असल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांचेकडे तक्रार केली, त्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात अली, पडताळणी किनारे पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील ,किरण रासकर ,पोलीस हवालदार सचिन गोसावी मनोज पाटील ,किरण अहिरराव व जाधव यांच्या पथकाने शनिवारी थेट जळगाव गाठले तक्रारदार व हजारे यांची चौकशी केली व त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात अली .
शनिवारी दिनांक ;१९ रोजी अटक करण्यात आली .
0 Comments