"मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार"


आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने तयारी सुरु केलीये. तर मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास भाजपा नेते राम कदम यांनी व्यक्त केलाय.

(Advertise)

हैदराबादमधील महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर राम कदम यांनी ट्विट केलंय. ते ट्विटमध्ये म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बिहारनंतर हैद्राबादमध्ये देखील यश मिळवलं. यामधून देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय.”

(Advertise)

ते पुढे म्हणाले, “३० वर्षांच्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलीये. कोरोनाच्या काळात देखील जो निष्काळजीपणा केलाय तो लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मुंबई पालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार.”

Post a Comment

0 Comments