महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादन ; चंदगड येथे आदरांजलीपर कार्यक्रम संपन्न


भारतीय राज्यघटनेने शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चंदगड समाज मंदीरात आदरांजलीपर कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका नेत्रदीपा कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मयुर मोरे(औरंगाबाद),चंदगड पंचायत समिती सभापती अॅड.अनंत कांबळे,संघर्ष प्रज्ञावंत(वं.ब.आघाडी,चंदगड तालुका) हे लाभले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती अनंत कांबळे यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगत शिक्षणाची ताकद काय असते हे पटवून दिले. बाबासाहेबांचा एक गुण जरी अंगीकारला तरी आयुष्य कसं सुखकर होवू शकतं यावर चंदगड महाविद्यालयाचे प्रा.जाधव सर यांनी प्रकाश टाकला.

चंदगड तालुक्यातील नवोदित लेखक,कवी आणि पत्रकार रजनी कांबळे,अंकुश कांबळे,अभिजित कांबळे आणि मेघा कांबळे यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत आजच्या भरकटलेल्या समाजाचं आणि एकूणच दिशाहीन चळवळीचं वास्तव मांडलं...
वैदैही कांबळे या चिमुरडीने बाबासाहेबांच्याविषयी दोन शब्द व्यक्त केले. यावेळी र भा माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा.जाधव सर, प्रा.दिवटे सर, प्रमोद कांबळे, नागोजी राव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.ए.डि.कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
दिपक माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments