ओसळली माणुसकी ! जावयानेच सासूवर केली जबरदस्ती; विनयभंगाचा गुन्हा दाखल


एका महिलेने आपल्या जावयावरच विनयभंगाचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.  रात्री महिला तिच्या घरामध्ये पूजा करत असताना, रात्री आठच्या सुमारास जावई तिथे आला. तिने त्याला दुसऱ्या रुममध्ये आराम करायला सांगितला. तक्रार नोंदवणारी महिला भोपाळच्या गोविंदपुरा भागामध्ये राहते. 

त्याच दिवशी रात्री १२.३० च्या सुमारास महिला पाणी आणण्यासाठी म्हणून विहिरीवर गेली होती. 
ती घरी आल्यानंतर जावयाने तिला त्याच्या रुममध्ये बोलावले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. महिलेने रात्री उशिरा गोविंदपुरा पोलीस ठाणे गाठले व जावयाविरोधात तक्रार नोंदवली.
 तिच्या तक्रारीवरुन जावयाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments