मागील ५ दिवसापासून बिबट्याच्या वावराने करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण



करमाळा/प्रतिनिधी:

मागच्या ५  दिवसापासून करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याच्या वावराणे भीतीचे वातावरण पसरले आहे. उजनी धरणाच्या ऊस पट्ट्यात सध्या भीती च वातावरण आहे .ऊस पट्ट्यात ऊस तोडणी केळी तोडणी चालू असून या कामांना सुद्धा विलंब होत आहे, प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून वेळीच या नरभक्षक बिबट्यांना आवर घातला पाहिजे, परिस्थिती च गांभीर्य ओळखून लवकरात लवकर निर्णय घ्यावे अशी मागणी लोकांन मधून जोर धरत आहे .

(Advertise)

करमाळा तालुक्यातील नदीकाठी व ओढ्याकाठी साधारणपणे झाडाझुडपांचे व बागायती पिकांचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्या नदी किंवा ओढ्याच्या काठाने प्रवास करतो, तसेच ज्या भागात बागायती पिके आहेत त्या भागात देखील वास्तव्य करतो. त्यामुळे अशा भागातील लोकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. 

(Advertise)

सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू असून ऊस तोडणीच्या टोळ्या उघड्यावर झोपड्या टाकून राहतात. उजनी जलाशयाच्या काठच्या बागायती भागात बिबट्या शिरल्यास त्याला शोधणे कठीण होईल म्हणून सर्व नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी आतापासूनच पोलीस व वन खात्याची मदत करणे आवश्यक आहे. ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागातील लोकांनी तात्काळ पोलिसांना व वनखात्याला कळवावे. असे आव्हान करण्यात आले आहे.

"ऊस पट्ट्यात बिबट्या चा वाढता वावर धोकादायक नागरिकांनी प्रशासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावं" - गणेश झोळ- पाटील

Post a Comment

0 Comments