कृषी कायद्यांविरोधात रितेश देशमुखही मैदानात ; म्हणाला, “मी सुद्धा शेतकऱ्यांसोबत"


मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. 

(Advertise)

मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी या आंदोलनावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. रितेश देशमुखनेही शेतकऱ्यांचं समर्थन करणार ट्वीट यावेळी केलं आहे.

(Advertise)

 रितेश देशमुखने ट्वीट करत म्हटलं की, ‘जर तुम्ही आज जेवत असाल तर त्याबद्दल शेतकर्‍याचे आभार माना. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसोबत एकजुटने उभा आहे.’ दरम्यान, बॉलिवूड आणि पंजाब सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोनू सूद, गुरदास मान, गिप्पी ग्रेवाल, हनी सिंग, कपिल शर्मा, स्वरा भास्कर, वीर दास, तापसी पन्नू यांच्यासह अनेक स्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments