"भाजपची बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार" - अशोक चव्हाण


मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावरुन राजकारण रंगत असताना नुकतंच त्यावर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. 

(Advertise)

“भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते,” अशी खोचक टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला.

सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

Post a Comment

0 Comments