कोरेगाव भिमामध्ये ३०डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत जमावबंदी; 'या' गावांत नागरिकांना प्रवेश नाहीपुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगावसह नजीकच्या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

 विजयस्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहे. भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(Advertise)

पुणे जिल्ह्यातील 'या' गावांमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी- भिमा कोरेगावच्या जवळील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी ६ वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

 कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

Post a Comment

0 Comments