आयसीसी (ICC) च्या अध्यक्षपदी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कलेआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी (ICC) न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांची निवड झाली आहे. त्यांनी इमरान ख्वाजा यांचा ११-५ असा पराभव करत सहा मतांनी निवडणूक जिंकली.
(Advertise)

इमरान ख्वाजा जुलै २०२० पासून आयसीसीच्या हंगामी अध्यपदी होते. आयसीसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. याआधी २२ नोव्हेंबर २०१५ पासून ३० जून २०२० पर्यंत शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष होते.

(Advertise)

‘ICC चे अध्यक्षपद मिळणे हा माझा बहुमान आहे. या सन्मानासाठी मी आयसीसीतील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. क्रिकेटचा विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करु. 
(Advertise)

मला आशा आहे, की सर्व उमेदवार मिळून महामारीपासून लढणाऱ्या क्रिकेटला पुढे घेऊन जातील. १०४ सदस्य मिळून क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करु, असे ग्रेग बार्कले म्हणाले.’

Post a Comment

0 Comments