पाथरीजळ महिलेला लुटणाऱ्या तिघांना तालुका पोलिसांनी कळंब तालुक्यात केली अटक, दोन लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत


बार्शी/प्रतिनिधी:

पुण्याहून दुचाकीवरून ( केज जिल्हा बीड ) गावाकडे निघालेल्या मुलगी व मानलेल्या भावाच्या वडीलाला अडवून,धारधार चाकुचा धाक दाखवून  त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण,तिन ग्रॅम वजनाचे कर्णफुले,रोख रक्कम व हातामधील घड्याळ असा  सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढुन घेऊन लंपास केला.याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ तपास करून या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

 यायाब अधिक माहिती अशी की, दुचाकी वरून प्रवास करणा-या महिलेस गावापासुन पाचशे मिटर अंतरावर तिघांनी मिळून अडवुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने व घड्याळ असा दोन लाख रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याचा प्रकार बार्शी-येरमाळा रस्त्यावर पाथरी ता.बार्शी गावाजवळील पुलावर दिनांक २३ रोजी घडला होता.

विद्या विजय बनसोडे वय ३५ रा.हडपसर,महंमदवाडी (पुणे) यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

 त्या आपल्या दुचाकी वरून मानलेल्या भावाचे वडील लिंबाजी जानराव यांच्या सोबत जात असताना पाथरी गावाच्या पुढे असलेल्या पुलावर अज्ञात तिन ईसमांनी त्यांची दुचाकी आडवुन चाकुचा धाक दाखवून  त्यांच्या गळ्यातील दिड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण,तिन ग्रॅम वजनाचे कर्णफुले,रोख रक्कम व हातामधील घड्याळ असा ऐवज जबरदस्तीने काढुन घेऊन लंपास केला.

याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा  गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक डॉ तेजस्वी सातपुते  व पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी जायपात्रे यांनी तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला बाबा आबा काळे वय २२ रा खामकर वाडी ता कळंब याला अटक केली तर त्यानंतर पाठलाग करून लखन काळे वय २३ रा येरमळा, व विनोद रामेश्वर हरभरे वय २८ रा उपळाई ता कळंब या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

 सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजेश मंगरूळे, अभय उंदरे, सचिन माने, धनंजय फत्तेपुरे, योगेश मंडलिक,, राहुल बॉंदर,आप्पासाहेब लोहार,अन्वर आतार यांनी ही कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments