"डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीने पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांसमोर तगडे आव्हान"


पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने आपआपला तगडा उमेदवार रिंगणात उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आता कोणाचे विचार, आणि पक्ष या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला आमदारकीचे तिकीट देणार हे येणाऱ्या एक डिसेंबरच्या होणाऱ्या मतदानात कळेल. कारण अनेक पक्षांसमोर बंडखोरीचे ही मोठे आव्हान उभे राहिलेले दिसून येत आहे.
     
(Advertise)

 परंतु संभाजी ब्रिगेडसारख्या एका सामाजिक आणि वैचारिक संघटनेमध्ये काम करणारे आणि त्यांच्या परखड विचारांनी संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करणारे एक वैचारिक व्यक्तिमत्व या पदविधर आणि शिक्षक निवडणुकीत त्यांच्या विचारांची धार आजमावत आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी त्या व्यक्तिमत्वाच्याच नावाचीच चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजेच, इतिहासतज्ञ डॉ.श्रीमंत कोकाटे सर..
(Advertise)

"लोकवार्ता" च्या प्रतिनिधींनी या निवडणुकीसंदर्भात कोकाटे सरांसोबत चर्चा केली असता. त्यांनी सांगितले कि, “गेल्या दोन वर्षापासून पदवीधरांची नाव नोंदणी, त्यांच्या समस्या जाणून घेणे, ज्यावेळी या मतदार संघाकडे पाहत नव्हते, त्यावेळेपासून आपण पदवीधरांच्या संर्पकात आहोत. त्यांच्या सर्व अडचणी माहिती आहेत. त्याचा स्वतंत्र अजेंडा घेवूनच ही निवडणूक लढवणार आहे. पदवीधर हे सुज्ञ आहे. त्यांना त्यांच्या मागण्या किंवा अडचणी दूर करणारा उमेदवार माहिती आहे.”
(Advertise)

पदवीधरची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याची निवडणूक नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्‍यात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले पाहिजे. गावगावात उच्च शिक्षित अधिकारी तयार झाला पाहिजे, हाच उद्देश ठेवून निवडणूक लढविली जाईल. तरुणांच्या हातात लेखनी आणि पुस्तक द्यायचे आहेत. त्यादृष्टीनेच वाटचाल केली जाईल. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिड लाख पदवीधरांची नोंदणी केली असल्याचेही डॉ. कोकाटे यांनी सांगितले.
(Advertise)

अशा अनेक कारणामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून स्वतंत्र निवडणूक लढवत असलेल्या डॉ. श्रीमंत कोकाटे पदवीधर मतदारसंघातून लोकप्रिय उमेदवार ठरत असल्याचे चर्चा आहे. अनेक संघटना व पदवीधरांचे पाठबळ त्यांना मिळत आहे, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख दिली.

Post a Comment

0 Comments