बार्शी/प्रतिनिधी:
शहरातील नामवंत आणि गरिबांचे डॉक्टर म्हणून तालुक्यात लोकप्रिय असलेले डॉ. काका कुलकर्णी (सामनगावंकर) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. आयुष्यभर कामगार, हमाल आणि हातावर पोट असलेल्या रुग्णाची अत्यल्प दरात सेवा करण्याचं काम काकांनी केलं. बार्शीतील इंडियन रेडक्रॉस संघटनेच्या सचिव पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
टिळक चौकाजवळील हेडे गल्ली येथे काकांचा दवाखाना आजही कार्यरत आहे. परिसरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी वर्दळ काकांच्या दवाखान्यात असत. काका आणि नाना या दोन्ही भावांनी रुग्णसेवेसाठी आपलं आयुष्य वेचलं.
म्हणूनच, काकांच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील महिला भगिनींनाही त्यांचं अंत्यदर्शन घेताना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान,दोन वर्षांपूर्वी नानांचे निधन झाले होते. त्यानंतर, आज काकांचीही प्राणज्योत मालवली. नाना आणि काका यांच्या निधनामुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात अखेरच्या श्वासापर्यंत सेवाधर्म जपणाऱ्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments