पंढरपुरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे २७ एकर ऊस जळून खाक


पंढरपूर/प्रतिनिधी

उसाच्या शेतातून गेलेल्या वीज वाहक तारांचे घर्षण झाल्याने शिरढोन (ता. पंढरपूर) येथे तोडणीस आलेला २७ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. सुमारे २२ ते २३ एकर  ऊस शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये येथील १० ते १२ शेतकऱ्यांचे जवळपास २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी या गावी आठ दिवसांपूर्वीच सुमारे २७ एकर क्षेत्रात तारांच्या घर्षणामुळे लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते,  यामुळे वीज वितरण कंपनी हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
(Advertise)
शिरढोन गावापासून  दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्नास एकर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. परंतु या वीज वाहतूक तारा जुन्या आणि कुचकामी झाल्या आहेत. शिवाय त्या खाली लोंबत असल्याने घर्षण होऊन आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकवेळा तक्रारी करुनही वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष दिले नाही.
(Advertise)
गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान जांभूळवन परिसरात वीज वाहक तारकांच्या घर्षणामुळे क्षेत्राला आग लागली, प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला, आग इतकी भयानक होती की आगीचे लपटे शिरढोन गावापासून दोन ते तीन किलोमीटरचा परिसरापर्यंत दिसून येत होती, या आगीमध्ये समाधान भुसनर यांच्या दहा एकर ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर १० ते ११ शेतकऱ्यांची ऊस जळून खाक झाला आहे. ५० एकर क्षेत्राच्या लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांनी तात्पुरता दाखवल्यामुळे २७ एकर उसाचे नुकसान तर २२ ते २३ एकर ऊस वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे
(Advertise)
आधीच महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठचे शेतकरी संकटात असतानाच पुन्हा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे.

Post a Comment

0 Comments