बार्शी/प्रतिनिधी;
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नाशिक विभागातील विभागीय उपायुक्त दिलीप स्वामी यांची मंगळवारी नियुक्ती केली. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ हे अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाने मंगळवारी सायंकाळी राज्यातील आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. यात सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर स्वामी यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. नुकतेच स्वामी यांना आयएएस पदाचे नामांकन प्राप्त झाले आहे. शासन आदेशानुसार स्वामी यांनी नाशिक विभागीय कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली
स्वामी हे लातूर जिल्ह्यातील तोंडार (ता. उदगीर) येथील आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाले होते. स्वामी यांनी राज्यभरात विविध शहर व जिल्ह्यात आपली सेवा बजावली आहे. त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य शासनाने त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे.
0 Comments