रेल्वेच्या या सरकारी कंपनीतील भागीदारी विकणार ; मोदी सरकार घेणार मोठा निर्णय


 केंद्र सरकार रेल्वे इंजीनिअरींग कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड मधील १५ टक्के भागीदारी विकण्याची योजना बनवत आहे.  हे स्टेक ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमातून विकण्यात येणार आहेत.  सरकारकडे सध्या इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची  ८९.१८ टक्के भागीदारी आहे. ज्यापैकी १५ टक्के भागादारी विकण्याच्या विचारात सरकार आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. इरकॉन इंटरनॅशनल ही सरकारी इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे.

इरकॉन इंटरनॅशनल कसली कंपनी आहे?

 इरकॉन इंटरनॅशनल ही एक शासकीय अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी आहे.  कंपनी पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल, बोगदा, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता, धावपट्टी, विद्युत, यांत्रिकी आणि औद्योगिक क्षेत्रात विकास करणारी इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. कंपनीची उपस्थिती परदेशातही आहे, याठिकाणी कंपनी बाजारात वृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहे

याशिवाय सरकार शेअर्सच्या विक्रीसाठी इंडियन रेलवे केटरिंग अँड टूरिझम कॉर्प. लिमिटेड (IRCTC) आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) मधील भागीदारी विकण्याच्या तयारीत देखील आहे.

Post a Comment

0 Comments