वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापुरात वीज कार्यलयात ठिय्या आंदोलन; वीज बिल माफ न केल्यास एक लाखाचा मोर्चा काढणार - वंचित बहुजन आघाडी



सोलापुर/प्रतिनिधी:

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोलापूर शहर जिल्ह्यातल्या कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीमधील वीज बिल माफ झाले पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा सो.म.पा.नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली काल सकाळी ११ वाजता एम.एस.ई.बी चे कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर पडळकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

(Advertise)

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देत असताना नगरसेवक चंदनशिवे यांनी वीज बिल आठवडाभर मध्ये माफ न झाल्यास एक लाखाचा मोर्चा काढणार असा इशारा दिला. या आंदोलना वेळी वीज "बिल माफ करा" अशा घोषणा देण्यात आल्या. जुनी मिल एम.एस.ई.बी कार्यालयांमध्ये घोषणाने परिसर दणाणून गेला.  
(Advertise)

ठीय्या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी, महिला शहरअध्यक्ष नगरसेविका ज्योती बमगुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, युवा शहराध्यक्ष गौतम चंदनशिवे, बाळासाहेब तांबे, विजय बमगुंडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, महिला उपाध्यक्ष मंदाकिनी शिंगे, हेमलता वाघमारे, सुजाता वाघमारे, चाचा सोनवणे, अनिरुद्ध वाघमारे, रवी थोरात, विनोद इंगळे, सुहास सावंत, सुरज गायकवाड, अभिजीत गायकवाड, सिक्ंदर कांबळे, ॲड.मलिक कांबळे, शेरा मोकाशी, विशाल सर्वगोड, अमर वाघमारे आदि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments