पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार नंदकिशोर गायकवाड यांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अनेक उमेदवार पडले पेचात...


सिद्धार्थ वाघमारे/प्रतिनिधी:

महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी आताच जोरात रंगु लागली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष, संघटना आणि त्यांचे उमेदवार आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. आता कोणता उमेदवार कोणते आश्वासन देतो. यापेक्षा तो शिक्षकांचे आणि पदवीधरांचे महत्वाचे कोणते प्रश्न घेऊन लढत आहे. याकडे सध्या तरी मतदार अभ्यासपूर्ण दृष्टीकोणातून पाहत असल्याचे दिसत आहे.
       
(Advertise)

परंतु या सर्वांमध्ये रयत सेवक मित्रमंडळाचे सचिव, महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष व शिक्षक मतदार संघाचे श्री. नंदकिशोर गायकवाड सर यांचा उमेदवारांवर खऱ्या अर्थाने प्रभाव पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना हि निवडणुक जड जाणार हे मात्र तितकेच खरे. 
         
(Advertise)

आमच्या लोकवार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड सर यांनी सांगितले की, आज पर्यंत जेवढे शिक्षक आमदार निवडून आले, त्यांनी शिक्षकांना निवडणुकीमध्ये फक्त आश्वासने दिली परंतु त्या आश्वासनांची पुर्तता झालेली कोठेही दिसून येत नाही. निवडून येणारा उमेदवार त्यांनी केलेल्या घोषणांमधील एखाद्या आश्वासनाची पुर्तता करतो. व पुढील निवडणुक येईपर्यंत आम्ही वचननामा पुर्तता केल्याचा आव आणतो. परंतू आमच्याकडे कोणतीही सत्ता नसतानासुध्दा आम्ही संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो शिक्षकांच्या अडचणी आणि प्रश्न मार्गी लावले आहेत. आज खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न आणि अडचणी मी सोडवाव्या. म्हणुन शिक्षकांच्या आग्रहास्तव मला शिक्षकांना न्याय देण्यासाठी उभा रहावे लागले आहे.
    
(Advertise)

 पुढे गायकवाड सर यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, येणाऱ्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणुन उभारलेल्या नकली लोकांना सुज्ञ जनता नाकारणार आहे. त्यामुळेच सर्वांनाच जीवाचे रान करून प्रचार आणि प्रसार करावा लागत आहे. तरी येणाऱ्या १ डिसेंबरला सर्व शिक्षक बांधवांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन मला अर्थात तुमच्या हक्काच्या माणसाला विजयी करावे. असे सरतेशेवाटी गायकवाड सर यांनी सर्व मतदारांना परत एकदा आवाहन केलेले आहे.

Post a Comment

0 Comments