“बिहार निवडणुकीतील विजय देवेंद्र फडणवीसांमुळेच” बिहार निवडणुकीचा निकाल हाती असून यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे बिहारचे प्रभारी होते. त्यांनी तेथे मोठे काम देखील केले.

यावर या विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचेही यश आणि विजय आहे. असे त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलमध्ये आणि सुरुवातीच्या निकालात बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे या निकालात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी सर्वात जास्त सभा घेतल्या होत्या. तरुणांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळत होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेऊन वातावरण तापवले होते. अखेर या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments