‘दारूची दुकाने सुरू आणि मंदिरं बंद, सरकारचं काय चाललं?’, भिडे गुरूजींचा निशाणा


राज्यात मंदिरांना उघडण्यास अजुन परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यात येत आहे. दिवाळीनंतर मंदिरं उघडण्यासंबंधी विचार करून असं सरकारने सांगितलं आहे. आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांनी या मुद्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 दारुची दुकाने उघडली हे समाजासाठी हितकारक आहे का असा सवाल केलाय. दारुची दुकाने हॉटेल्स सुरू आणि मंदिर बंद हे कसं काय असू शकते असा सवालही त्यांनी केला. आषाढी वारी ही परकीयांनीही बंद केली नव्हती मात्र ती यावर्षी बंद राहिली. कोरोनाची जास्त भीती निर्माण केली गेली आहे. यात सगळ्या यंत्रणेचाच फायदा आहे असंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments