"श्री. सर्जेराव जाधव यांची पुणे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात आघाडी व शिक्षकांचा प्रचंड प्रतिसादामुळे विजय निश्चित"- एस. एस. माने


सोलापूर/प्रतिनिधी:

१ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून  प्रत्येक उमेदवार आपल्यापरीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र श्री. सर्जेराव जाधव यांना शिक्षकांच्या  मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात मोठी सरशी झाली आहे.
(Advertise)

२०२० च्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडुका अनेक कारणासाठी ऐतिहासिक आहेत. या निवडणुकीमध्ये गेल्या ६० वर्षांमध्ये यंदा प्रथमच अनेक राष्ट्रीय व स्थानिक पक्षांनी आपले थेट उमेदवार दिले आहेत. शिक्षण आणि शिक्षक समाजाला घडवण्याचे काम करीत असतात.
(Advertise)

 त्यांचे प्रतिनिधी विधिमंडळात असावेत यासाठी या निवडणूका होत असतात. शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत थेट पक्षांनी उतरणे हा एक भयंकर प्रकार आहे असं मला वाटत. यामुळे शिक्षणाचा स्वाभिमान मोठ्या पक्षांच्या वळचणीला गहाण पडण्याची शक्यता आहे.
(Advertise)

शिक्षक हा निष्पक्ष आणि निर्वैर असेल तरच समाज सुदृढ आणि लोकशाही सशक्त होते. जर शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत पक्षीय राजकारण घुसले तर शाळा महाविद्यालयांची स्टाफरूम पक्षा-पक्षांच्या भांडणाचे आखाडे बनतील. या गोष्टीचे विद्यार्थ्यंच्यावर, शिक्षणावर आणि पर्यायाने समाजावर अनेक विपरीत परिणाम होतील. म्हणून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी उतरू नये असे माझे स्पष्ट मत आहे. 
 
शिक्षकाचे वर्तन, विचार व कार्य हे निष्पक्षच असले पाहिजेत.आणि म्हणूनच  सर्व  शिक्षक बंधू नी  याचा विचार  करून आपले शिक्षक बंधू श्री.सर्जेराव जाधव यांनाच आपला शिक्षक आमदार म्हणून  निवडणे  योग्य ठरेल. 
      

Post a Comment

0 Comments