अन्यथा आदिनाथ कारखान्याप्रमाणे मकाई कारखान्याकडे ही मला लक्ष द्यावे लागेल - दशरथ (आण्णा) कांबळे


करमाळा/ प्रतिनिधी:

शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी मकाई कारखान्यांच्या संदर्भात माहिती दिली. मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कामगारांच्या पगारातून रक्कम कापूनही पीएफ खात्यात भरली नसल्याने मकाई सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विरोधात सोलापूर येथे कारखान्याने भविष्य निर्वाह निधीपोटी कामगारांच्या पगारातून ३२ लाख ६७ हजार ९८६ रुपये इतकी रक्कम कपात करूनही ती रक्कम पीएफ खात्यात जमा न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Advertise)

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व श्री मकाई सह.साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे.राष्ट्रवादी सोडुन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केला होता.
(Advertise)

 त्या निवडणुकीत दिग्विजय बागल यांच्या भगिनी रश्मी बागल यांचा पराभव झाला.या निकाल नंतर बागल पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.गेल्यावर्षी आदिनाथ व मकाई दोन्ही कारखाना बंद होते.यावर्षी आदिनाथ हा भाडेतत्त्वावर देण्याचा बागल यांनी निर्णय घेतला आहे.
(Advertise)

तर मोठ्या प्रयत्नानंतर मकाई सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला आहे. एकीकडे मकाई वाचवण्यासाठी आदिनाथ गहाण ठेवण्याचा आरोप बागल कुंटुबियावर होत असतानाच कामगाराच्या पीएफच्या रक्कमेत अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविषयी उलट चर्चा सुरू झाली आहे.
(Advertise)

मकाई कारखान्याच्या कामगाराच्या साधारणपणे २४ महिन्याच्या पगारी थकल्या आहेत.त्याच पीएफ जमा केला नसल्याचे उघड झाले आहे.भाविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) कामगारांच्या पगारातून रक्कम कपात करून ती न भरल्यामुळे करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांच्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर शेतकरी कामगार संघर्ष  समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, प्रतिक्रिया देताना म्हणाले आदिनाथ कारखान्याचे वाटोळे करून आता मकाई कारखान्यावर ही घाव घातला आहे, बागल कुटुंबियांनी कामगारांनवरिल अन्याय थांबवावा अन्यथा आदिनाथ कारखान्यांमध्ये ज्याप्रमाणे लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून दिला. त्याचप्रमाणे मकाई कारखान्यात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देणार त्यांचा भविष्य निर्वाह निधी लवकर कारखान्याने जमा करावा, अधिक बोलताना कांबळे म्हणाले मकाई कामगारांच्या पगारी संदर्भात पत्रकारांनी प्रसिध्द केलेल्या बातमीची दखल घेतली, मी कारखान्याचे एम डी खाटमोडे यांच्याशी फोनवरून पगारी सर्दभांत चर्चा केली, असता म्हणाले येत्या दोन दिवसांत बुधवार पर्यत आम्ही पगारी करण्याचा निर्णय घेतला आहे, व साखर वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती खाटमोडे यांनी दिली जर बुधवारी पर्यत साखर वाटप न केल्यास  कामगारांची बैठक घेऊन कारखान्याच्या विरोधात काटा बंद आंदोलन करण्यात येईल अशा इशारा कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला.

Post a Comment

0 Comments