६० वर्षाच्या विधवा महिलेवर पॉर्न’ पाहून तरुणाने केलाबलात्कार


 संपूर्ण मानवतेलाच काळीमा फासणारी अशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर परिसरात एका २१ वर्षीय तरुणाने पॉर्न पाहून ६० वर्षाच्या विधवा असलेल्या मित्राच्या आईवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने प्रकरण दडपण्याच्या हेतूने बलात्कारानंतर पीडित वृद्ध महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी विकास याला अटक करण्यात आली आहे.
(Advertise)

अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर परिसरात पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने लज्जास्पद प्रकार केला आहे. रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी विकास यांनी पॉर्न व्हिडिओ पाहिला आणि ६० वर्षीय मित्राच्या आईवर नशेत बलात्कार केला. त्यानंतर पीडित वृद्ध महिलेची हत्या करण्याच्या उद्देशाने तिला जखमी केले आणि त्यानंतर महिलेला खोलीत बंद करुन घटनास्थळावरुन पळ काढला.
(Advertise)

नंतर पोलिसांनी शाहाजहांपूर येथे महिला डॉक्टर नसल्यामुळे बर्डोद रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली. या घटनेमध्ये पीडित महिला जखमी झाली असून आरोपी विकासला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments