"प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे” एकनाथ खडसे


 ‘एकनाथ खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंवर टिका केली. यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 
(Advertise)

“जनतेने मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड  यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे” असं खुलं आवाहन खडसेंनी प्रसाद लाड यांना दिलं आहे.
(Advertise)

त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असं खडसे म्हणाले.“माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता” असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला.
(Advertise)

“मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार ‘एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नाही’ असं का म्हणतात? माझं नाव वारंवार का घेत आहेत?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे. 

Post a Comment

0 Comments