नराधमांने केला अपंग मुलीवर बलात्कार


 
बुलढाणा जिल्हय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे एका नराधमाने अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी बलात्कार केल्याची घटना घडली.पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे (३४) याने एका २१ वर्षीय जन्मत: बोलता येत नसलेल्या अपंग मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. 

घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. रिकामे भांडे भरून आणण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ घरी परतली नाही. जवळच एका घरासमोरील प्रसाधनगृहात ती रडत असल्याचा आवाज आल्यावर पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, आरोपीला चोप देऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. आईने थेट तामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments