"बिहार मधील एनडीएचा विजय आपल्याला मान्य नाही" - प्रकाश आंबेडकरबिहारमधील एनडीएचा विजय आपल्याला मान्य नसल्याचंही ते म्हणाले आहेत. बिहार निवडणूक काळात भाजप सरकार आहे कित्येक वेळा दंगली घडविण्याचा प्रयत्न केला पण तो पण तो डाव आम्ही यशस्वी होऊ देणार आहे असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये पत्रकार परिषदेत केले.

 बिहार विधानसभेत एनडीएला काटावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली.

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे. करोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?, अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम करत असल्याची टीका केली.

Post a Comment

0 Comments