एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेचा निकाल जाहीर..पुणे/प्रतिनिधी : 

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम आणि पीसीबी पर्सेंटाईल गटात पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना आपले निकाल mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

१०० पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात पुण्याची सानिका गुमास्ते, शुभम जोग तर मुंबईतून केतकी देशमुख, चैतन्य व्होरा, सोहम चिटणीस, निष्ठा पांडे, आर्यमन शार्दुल, रिशभ बाली, पार्थ गुजराती आण ठाण्यातून पवन कुंटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीबी गटात पुण्याचा अनिष जगदाळे, पालघरची वर्षा खुशवाह, मुंबईतील तनय मांजरेकर, देवेश शाह, जयेश चौधरी, परिता गाडा या विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली.

Post a Comment

0 Comments