"ज्यांना समाजात काही किंमत नाही ; तोल गेल्यासारखे बरळतात" अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कडाडले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे छोटे नेते असून त्यांचा अभ्यास नसतो अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरून  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
(Advertise)

काही लोक काहीही बरळत आहेत.तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
(Advertise)

काही लोकं काहीही बरळायला लागली आहेत. विशेष करुन विरोधी पक्षनेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांना हे कितपत शोभतंय, त्यांना समाजात किती किंमत आहे? पवार साहेबांनी एखाद्या व्यक्तीला केंद्रीत करून राजकारण केलं नाही. त्यांनी नेहमी समाजासाठी काम केलं. 
(Advertise)

विरोधी पक्षातील नेते स्वतःचा तोल गेल्यासारखं वक्तव्य करतायत. त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. आपण कुणाबद्दल बोलतोय. काय बोलतोय, हे सुद्धा या लोकांना कळत नाही. त्यांची तेवढी ऊंची तरी आहे का?, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments