श्रीपत पिंपरी एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना परिसरात खळबळ


श्रीपत पिंपरी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे सहा घरातून रोख रक्कम व दागिने लंपास झाले आहेत, या घटनेने पिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे.
(Advertise)

याबाबत अधिक माहिती मिळाली की, गावातच आनंद घाडगे यांचे किराणा दुकान आहे. दि. १९  रोजी ते साडेनऊ वाजता दुकान बंद करून गेले असता जेवण करून झोपले. सकाळी साडेसहा वाजता पत्नी शितल साफसफाईसाठी आले असता दुकानाचे कुलूप फुटल्याचे दिसून आले, तिने घरी जाऊन पतीकडे चौकशी केली त्यानंतर दुकानाचे मालक आनंद घाडगे यांनी कॅश काउंटर मधील साडेसहा हजार गायब झाल्याचे कळले.  गावातील सतीश व्यवहारे घराचे कुलूप तोडून जोराने प्रवेश केला चोराने कापटातील दागिने गायब केल्याचे लक्षात आले.
(Advertise)

संतोष पिंगळे, हनुमंत चव्हाण, महादेव बापू जाधव, रामा ताकभाते यांच्या घरातील घराचे कुलूप तोडून अशाच प्रकारचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे रात्रीत सहा ठिकाणी चोरी केल्या घडल्यामुळे श्रीपत पिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे, ह्या घटनेचा बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे, अधिक तपास पोलीस अधिकारी प्रवीण जाधव हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments