पंढरपूर मध्ये एसटी बससेवा ला सशर्त परवानगी, खाजगी वाहनांना पंढरपुरामध्ये बंदी


पंढरपूर/प्रतिनिधी:

कार्तिकी वारी दरम्यान पंढरपूर मध्ये गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 25 ते 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये दोन दिवसाची संचारबंदी करण्यात आली आहे, पंढरपूरकडे येणारी आणि बाहेर जाणारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, मात्र यावेळी जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर करांसाठी एसटी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर करांची वारीकाळात गैरसोय होऊ नये यासाठी ही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे एसटी महामंडळाकडून प्रवाशी वाहतूक ही कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून केली जाणार आहे. माहिती पंढरपूर आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी दिली आहे. ही प्रवासी वाहतूक चंद्रभागा बस स्थानकामधून होणार आहे.

(Advertise)

कार्तिकी वारी मध्ये तीन स्तरावरती नाकाबंदी

कोरोनामुळे आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक पध्दतीने कार्तिकी यात्रा साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने भाविकांना केले आहे. यात्रा काळात भाविकांनी पंढरपुरात येऊ नये, असेही जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात संचार बंदी लागू केली. मठांमध्ये राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बाहेर गावचे भाविक यात्रा काळात पंढरपुरात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्रिस्तरीय नाकाबंदीचे नियोजन केले आहे त्यात जिल्हास्तर तालुकास्तर व पंढरपूर शहरांमध्ये ही नाकाबंदी असणार आहे.
(Advertise)

खाजगी वाहनांना पंढरपुरात  येण्यास मनाई

जिल्हा प्रशासनाने यंदाची कार्तिकी यात्रेसाठी निर्बंध घातले आहेत. रविवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 12 वाजेपर्यंत खाजगी वाहतूक किंवा पंढरपूरमध्ये बंदी करण्यात आली आहे. पंढरपुराकडे येणाऱ्या खाजगी मालवाहतूक, जड वाहने तसेच किरकोळ वाहकांना ही पंढरपूर मध्ये येण्यास मनाई असणार आहे. पंढरपूर कडे येणारी मालवाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. पंढरपुरात येणारी आपत्कालीन व्यवस्था वाहतूक व एसटी वाहतूक यांना मुभा देण्यात आली आहे, त्यातही पंढरपूर शहराच्या सात ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ही नाकाबंदी 24तास असणार आहे.
(Advertise)

एसटी विभागाकडून सर्व नियमांचे पालन करून बस सेवा

पंढरपुरातून एसटीची प्रवाशी वाहतूक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यात्रा काळात एसटीची प्रवाशी वाहतूक सुरू ठेवण्यात संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशी वाहतूक ही कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून केली जाणार आहे. शासनाकडून आणि एसटी विभागाकडून आलेल्या सुचना नुसार पुढील कार्यवाही केली जाईल. प्रवासी वाहतुकीसाठी चंद्रभागा मैदान बस स्थानकाची सोय करण्यात आली आहे
(Advertise)

पंढरपूर शहरात कार्तिकी वारी दरम्यान पोलिसांचा फौजफाटा

सध्या कोरोनाचा परिस्थितीत कार्तिकी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी कार्तिकी यात्रा भरून न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाविकांना पंढरपुरात न येऊ देण्यासाठी १८०० पोलिसांचा बंदोबस्त जिल्हा व पंढरपूर शहर परिसरात लावण्यात आला आहे. पंढरपूर शहर व शहरालगतच्या १० किलोमीटर परिसरामध्ये व १० गावांमध्ये संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. मात्र शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments