रणजितसिंह देशमुख यांची काँग्रेसमध्ये घरवापसी!


रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००७ साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामं करत माण- खटाव तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची पाळुमुळे घट्ट केली. २००३ च्या दुष्काळात सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता.

पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठीच्या सिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी त्यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. प्रसंगी कृष्णा खोरे कार्यालयावर तीव्र जनआंदोलन उभारून उरमोडी आणि जिहे कठापूर या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. याच भागात सहकारी उद्योगांची यशस्वीपणे उभारणी करणारे रणजित देशमुख औद्योगिक क्रांतीचे पहिले आयडाँल नेते ठरले. त्यामुळेच कायम दुष्काळी माणदेशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून देशमुख नावारूपाला आले.

शिवसेनेतुन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गांधी भवन, मुंबई येथे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. 

 या वेळी या कार्यक्रमासाठी महसूलमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.ना. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, उदयसिंह  उंडाळकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments