राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. भारत नाना भालके यांच्या पार्थिवावर चार वाजता सरकोली येथे अंत्यसंस्कार


पंढरपूर/प्रतिनिधी:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. दुपारी चार वाजता सरकोली येथे आमदार भारत नाना भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आ भारतनाना भालके पार्थिव शरीर सकाळी 7.35 वाजता पुणे येथून मार्गस्थ झालेले आहे. दुपारी 12.31 ते 1.00 च्या दरम्यान टेंभुर्णी मार्गे गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना काही वेळ अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंढरपूर वरून दुपारी 1.30 वाजता आमदार भालके यांच्या मूळ गावी सरकोली येथे दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येईल. दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावरती सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंढरपूर येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आमदार भालके यांचा एक प्रकारची श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

आमदार भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातदेखील केली होती. मात्र त्यांना आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे उपचारासाठी रूबी हाॅस्पीटलमध्ये दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांची शुक्रवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली.

Post a Comment

0 Comments