भारत नाना यांची प्रकृती स्थिर, पंढरपुरात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा


मंगळवेढा/प्रतिनिधी:

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांची यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा त्याची माहिती रुबी हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर रोजी भारत नाना भालके यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
(Advertise)

पंढरपूर मंगळवेढा आमदार भारत नाना भालके यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू असून. आमदार भारत भालके यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

आमदार भारतनाना भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
(Advertise)

आमदार भारत नाना भालके हे पंढरपूर व मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून बारा वर्ष झाले काम करत आहे. या मतदारसंघांमधून विविध पक्षातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवून जिंकली आहे. २००९ सालि तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक तर २०१९ आली ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा भारत नाना भालके पराभव केला होता. मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात आमदारकीच्या माध्यमातून भारत नाना भालके यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहे

Post a Comment

0 Comments