डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन २०१९-२० मध्ये १६ विहिरीला मंजूरी- उपसभापती दत्तात्रय सरडे


करमाळा / प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यात २०१९ - २०२०मध्ये १६ विहिला मंजूरी देण्यात आली, अशी माहिती उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी दिली. 

यावेळी बोलताना सरडे  म्हणाले, मंजुर १६ विहिरी पैकी  सात विहिरींची कामे चालू आसुन त्यापैकी तीन विहिरी पूर्ण आहेत तालुक्याला सदर विहिरीसाठी फक्त २५  लाख प्राप्त झाले होते  त्यापैकी १५ लाख ६० हजार खर्च झाला असून नऊ लाख ४० हजार शिल्लक आहेत. 

आपण तालुक्यातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये देऊन काम पुर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना लाईट कनेक्शन मोटार इत्यादी इतर साहित्य ५० हजार पर्यत देण्यात येते, एकुन एका विहिरीला एका शेतकऱ्याला तीन लाख इतके  अनुदान देण्यात येते असे करमाळा पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी माहिती दिली. यावेळी माजी सभापती शेखर तात्या गाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments