अहमद पटेल यांचे निधन; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली



काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालंय. अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिलीये.
(Advertise)

नरेंद्र मोदी म्हणाले की, “अहमद पटेल यांच्या निधनाने मी दुःखी झालोय. अदमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रसे नेहमी स्मरणात ठेवेल”.
(Advertise)

पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिलीये. हा एक दु: खद दिवस असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 
(Advertise)

राहुल गांधी म्हणतात, आजचा हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेसचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते. त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल.”
(Advertise)

दरम्यान, अहमद पटेल यांना १ महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी काही दिवस आधी ते संसदेच्या पावसाळी आधिवेशनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments